September 20, 2025 6:16 am

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

अहिल्यानगर मराठी न्यूज : संपादक शहाजी दिघे

प्रतिनिधी दि.१५ – श्रीक्षेत्र धानोरे घाट ता. राहुरी जि. आहिल्यानगर येथे श्री अंबिका माता व कळमजाई माता नवरात्र उत्सवानिमित्ताने धानोरे येथील युवा उद्योजक अमोल दिघे यांनी त्यांच्या वडिलांचे स्मृति प्रित्यर्थ धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर घातली असुन देवस्थानास कृष्ण मूर्ती व गायवासरू मूर्ती देवस्थानास भेट दिली आहे.

तसेच इंजिनिअर अनिकेत दिघे यांनी देवस्थानास अप्रतिम असे देवस्थानाचे नावाचे डजिटल नाव व करंज्या एल.इ.डी. असलेला सेटअप भेट दिला आहे.कृष्ण मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा व देवस्थानाचे नावाचे करंज्या सेटअप चा लोकार्पण सोहळा घट स्थापनेच्या दिवशी होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट कडून मिळाली तसेच ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भजनी मंडळ, धनेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने आश्विन शु ।।१ सोमवार दि.२२/९/२०२५ ते गुरूवार दि. २/१०/२०२५ अखेर आयोजित केला आहे.शारदीय नवरात्र उत्सवाचे हे वर्षे ३८ वे वर्ष असल्याचे उत्सव समितीने सांगितले शारदीय नवरात्र काळात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या ग्रामस्थ, भजनी मंडळ व उत्सव समिती यांचेकडून परिसर स्वछता, आर्थिक नियोजन, कळस रोहन कार्यक्रम, मिरवणूक कार्यक्रम, घटस्थापना, किर्तन नियोजन, दररोज किर्तन प्रसंगी करण्यात येणारे अन्नदान, संतूपूजन, मंडप टाकणे, विदयुत रोषणाई,पाणी व्यवस्थापन, कार्यक्रमाची माहिती जास्तीत जास्त ग्रामस्थांना कळविणे असे नियोजन सुरु आहे.

यामध्ये हरिपाठ सायंकाळी ५ ते ६.३०, सकाळी व सायंकाळी ६.३० वा. पंचोपचार पूजा व देवीची आरती तसेच सायंकाळी ७ ते ९ या वेळेत किर्तन होईल. घटस्थापनेच्या दिवशी मंदिरावरील कलश रोहणाचा कार्यक्रम होणार आहे व गोंधळ देवीचा सुशाबाई भालेराव व सहकारी रामपुर, ह.भ.प. गुरुदेव महाराज धारणगांवकर ह.भ.प.महेश महाराज रिंधे,ह.भ.प.विश्वनाथ महाराज गिरी, ह.भ.प.संदीप महाराज खंडागळे .भ.प.अरुण  महाराज दिघे, ह.भ.प.निलेश महाराज कोरडे, भागवताचार्य ह. भ. प.शिवदास महाराज पंडित,भागवताचार्य ह.भ.प.राधीकाताई करंजीकर, ह.भ.प. भाऊसाहेब महाराज काळे समाजप्रबोधनकार, ह.भ.प.जयश्रीताई तिकांडे, (माझा ज्ञानोबा मालिका फेम मायबोली चॅनल) यांचे जाहीर हरी किर्तन होणार आहे अंबिका माता प्रतिमेची मिरवणूक होईल. व ह.भ.प. बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तरी नवरात्र उत्सव काळात होणाऱ्या किर्तन श्रवणाचा परिसरातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे शारदीय नवरात्र उत्सव समिती कडून आव्हान करण्यात आले असल्याची माहिती धनेश्वर देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त मंडळ, भजनी मंडळ, ग्रामस्थ, उत्सव समितीने दिली.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा