September 19, 2025 5:16 am

प्रेरणा मल्टीस्टेट सोनगाव शाखेचा १२ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा 

अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा

सोनगाव प्रतिनिधी (अनिल वाकचौरे ): प्रेरणा मल्टीस्टेट सोनगाव शाखेचा १२ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

१३ व्या वर्षात पदार्पण करताना साईबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे संचालक नंदकुमार दिघे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी संस्थेची प्रास्ताविक माहिती सर्व सभासद खातेदार व कर्जदार यांना सांगितली यावेळी ते म्हणाले कि आजवरील प्रवासात आमचा हात घट्ट पकडून आपण जो आमच्यावर विश्वास दाखविला त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत व पुढील येणाऱ्या काळात पण आशेच सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच सोनगाव शाखेच्या १२ वा वर्धापन दिनानिमित्त सर्व सभासद ठेवीदार खातेदार कर्जदार व हितचिंतक यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व सर्वांचे आभार मानले.

यावेळी प्रेरणा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष सुरेश(आण्णा) वाबळे यांच्या मार्गदर्शनातील संचालक व सभासद यावेळी सुजित वाबळे ( चेअरमन) , नंदकुमार दिघे, विष्णुपंत वर्पे, मच्छिंद्र हुरूळे,बाळासाहेब दिघे, लक्ष्मण दिघे, पारसराम साबळे, श्री सुभाष दिघे, श्री डॉ मधुकर दिघे, उत्तमराम घोलप,रंगनाथ दिघे, शंतनू दिघे, सुनील पाटील, अनिल वाकचौरे , भगवान व्यास, एस बँकेचे मॅनेजर व कर्मचारी, तसेच सोनगाव शाखेचे शाखाधिकारी व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें