अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
कोपरगाव प्रतिनिधी प्रशांत टेके : संजीवनी स्वयं सहायता महिला बचत गट आयोजित शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात २२ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई कोल्हे यांच्या विशेष नियोजनातून हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. आदिशक्तीची उपासना भक्ती भावाने केली जाणार आहे.
देवीची स्थापना करत दैनंदिन जोगवा व आरती होणार आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत कोपरगाव तहसील मैदान या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ग्रुप गरबा दांडिया, कपल गरबा, कोपरगावची हिरकणी फॅशन शो, फ्लॉवर पॉट डेकोरेशन, पाककला, मेहंदी, पूजा थाळी, वेशभूषा, लाईव्ह कॉन्सर्ट, मेकअप स्पर्धा यासह विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रोज भाग्यवंत महिलांना बक्षिसे जिंकण्याची संधी असून रोज लकी ड्रॉ काढला जाणार आहे.
दोन ऑक्टोबर रोजी कोपरगावकरांचे नेहमीच आकर्षण ठरणारा संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित महिषासुर दहन सोहळा बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून संपन्न होणार आहे. महिला भगिनी मोठ्या संख्येने नवरात्र उत्सवात हजेरी लावतात यावर्षी देखील अतिशय दर्जेदार आयोजन या उपक्रमाचे संजीवनी महिला बचत गटाच्या वतीने झाले असून महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्नेहलताताई कोल्हे आणि बचत गटाच्या अध्यक्ष रेणुकाताई कोल्हे यांनी केले आहे.