अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
लोणी प्रतिनिधी: जनसेवा फाउंडेशनतर्फे १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शिव महापुराण कथेच्या भव्य सोहळ्याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ विधीवत पूजा करून मंगलमय वातावरणात करण्यात आला.
आगामी ऑक्टोबर महिन्यात सुप्रसिद्ध कथाकार श्री प्रदीप मिश्रा महाराज यांच्या उपस्थितीत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात येणार असून त्याचा शुभारंभ खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी त्यांनी संपूर्ण मैदानाची पाहणी करून संयुक्त व्यवस्था अधिक प्रभावी व नियोजन व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा संगम घडवणारा शिव महापुराण कथा कार्यक्रम तेवढ्याच भव्यतेने संपन्न होण्यासाठी नियोजन सुरू असून, अध्यात्मिक सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरावा असे नियोजन सुरू करण्यात आले आहे.गावोगावांतून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत.
ग्रामस्थांसाठी हा अभिमानाचा सोहळा ठरत असून, श्रद्धा आणि अध्यात्मिकतेचा मिलाफ असलेली शिव महापुराण कथा दिवसेंदिवस अधिक आकर्षणाचे केंद्रबिंदू बनत आहे.