अहिल्यानगर मराठी न्युज : शहाजी दिघे
राहता तालुक्यातील एकरुखे येथील जि.प. प्राथमिक शाळा एकरूखे येथे इयत्ता पहिली मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या नवागत मुलांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवाची संपूर्ण गावात प्रवेश फेरी झाली. नवीन दाखल मुलांना बैलगाडी सजवून गाडीतून संपूर्ण गावामध्ये संगीत ,ढोल ताशांच्या वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी नवीन मुलांना चॉकलेट, खाऊचे वाटप केले. प्रवेश फेरी शाळेत आल्यानंतर सर्व नवागत मुलांचे शाळेच्या गेट पासूनच फुलांच्या पाकळ्या फेकून जोरदार स्वागत करण्यात आले. मुलांना विविध खेळणी, फुगे देऊन तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
नवागतांचे पहिलं पाऊल ठसे घेऊन त्यांचे औक्षण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे विद्यमान सरपंच आदरणीय जितेंद्र गाढवे होते. तसेच कार्यक्रम प्रसंगी श्री जालिंदर गाढवे, मधुकर सातव एस एम सीचे अध्यक्ष बाळासाहेब पगारे, सदस्य रविंद्र भवर व इतर बहुसंख्य पालक व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश ,पाठ्यपुस्तक, बूट,साँक्स व वहयांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक राधाकिसन दळवी सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,
जानका गोर्डे मॅडम यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली. जगन्नाथ डांगे सर यांनी अनुमोदन दिले. सुनिता सातव मॅडम यांनी प्रवेश गीत सादर केले. मधुकर थोरात सर यांनी आभार प्रदर्शन केले व सुधाकर अंत्रे सर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अलका गाडेकर, संजिवनी गोर्डे,लिला चव्हाण,वैशाली गायकवाड, पौर्णिमा यादव,मयूरा कडू मँडम यांचे बहुमोल सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना स्वादिष्ट बुंदीचे गोड जेवण देण्यात आले.