September 20, 2025 6:28 pm

भालेरायवाडी येथील शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थी हळहळले.   

अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा

हनुमंतगाव प्रतिनिधी(संदिप गावडे ) – राहाता तालुक्यातील भालेरायवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले तर पालकांचे मन गहिवरून आले. 

यावेळी भालेरायवाडी येथे झालेल्या निरोप समारंभात प्रवरा कारखान्याचे संचालक अशोक घोलप यांनी या शिक्षकांच्या योगदानाला उजाळा दिला. तसेच नवीन आलेले शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.तसेच उपसरपंच प्राजक्ता अनाप ,माजी सरपंच गोरक्ष ब्राम्हणे,संजय अनाप सर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. बदलून गेलेल्या शिक्षकांविषयी जुन्या आठवणींना उजाळा दिला व त्यांच्या कामाचे कौतुक करून नव्याने आलेल्या शिक्षकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त केली.शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल डिंबर,उपमुख्याध्यापक श्री विठ्ठल कुटे व सुनीता वाघे(कुटे) यांनी विद्यार्थ्यांनी साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबविले आहे.मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभिनव उपक्रमांतर्गत सन २०२३-२४ चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा गटातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालेरायवाडी ह्या शाळेने राहता तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवित प्रमानपञ व तीन लाख रुपये बक्षीस मिळविण्याचा मान मिळविला आहे. 

सात वर्षांपूर्वी या शाळेत रुजू झालेले शिक्षक विठ्ठल कुटे व सुनीता वाघे (कुटे) यांची दुसऱ्या शाळेकडे बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ पालकांकडून ठेवण्यात आला होता.मागील गुरुजींना निरोप आणि नवीन आलेले गुरुजी श्री शेळके गुरुजी व श्री राजभोज गुरुजी यांचा सन्मान या दोन्ही गोष्टीमुळे पालक वर्ग संभ्रमात पडला. परंतु शेवटी अश्रू पुसत शाळा सोडून गेलेल्या गुरुजींना साश्रू नयनांनी निरोप दिला गेला.यावेळी शिक्षक विठ्ठल कुटे व सुनीता वाघे(कुटे)यांचा भालेरायवाडी ग्रामस्थ,प्रवरा कारखान्याचे संचालक,हनुमंतगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच ,शाळा व्यवस्थापन समिती,माता पालक शिक्षक समिती यांनी सत्कार केला. तसेच नवीन आलेले शिक्षक श्री शेळके व श्री राजभोज यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक अशोक घोलप,सरपंच मनीषा माळी, उपसरपंच प्राजक्ता अनाप, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गावडे,सावळेराम पाबळे,गोरक्ष ब्राम्हणे,भानुदास कानडे,विनायक अनाप,रामकिसन अनाप,शब्बीर शेख,नरोडे सर, विकी पाबळे,निलेश अनाप,समिती अध्यक्ष ज्ञानदेव अनाप,उपाध्यक्ष जालीदंर कानडे,स्वाती कानडे, सदस्य रूबीना शेख, सतीश घोलप,पत्रकार संदिप गावडे,संजय अनाप सर आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा