अहिल्यानगर मराठी न्यूज : राहुल फुंदे
शिर्डी : श्री साईबाबा वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य पद मुख्यत्वाने जबाबदारीचे असते.या पदाकरता सरकार निर्णय क्रमांक नियुक्ती २०११/ प्रक्रिया ३४४/११माशी ५ मंत्रालय विस्तार इमारत मुंबई तारीख १५ मार्च २०१२ त्यानुसार कारवाई होणे आहे. प्राचार्य हे मुख्य पद सेवा जेष्ठता शासन निर्णयानुसार नेमावे, यामुळे शिक्षणाचा दर्जा नक्कीच वाढेल यात काही शंका नाही, असे न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून आंदोलन करण्यात येईल.
वरिष्ठ महाविद्यालयात असलेले शैक्षणिक साधन साहित्य हे सर्व स्थानिक तसेच गरजू विद्यार्थ्यांकरता उपयोगी असल्याकारणाने त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होईल.
श्री साईबाबा महाविद्यालयात असलेले प्राचार्य हे पद शासन निर्णयानुसार नियुक्त करणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून श्री साईबाबा संस्थान शिर्डी उपकार्यकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले
महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे शिर्डी शहर अध्यक्ष प्रशांत वाघचौरे , शिर्डी मनसे चे शहराध्यक्ष लक्ष्मण अण्णा कोतकर, अभिषेक पोपळघट , चेतन झिंजाड , रवी कुसळकर, गौरव भालेराव , ऋषी धीवर, प्रवीण आसणे यावेळी विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते