September 20, 2025 1:44 pm

खेळामुळे विद्यार्थ्यांच्या प्रतिभा शक्तीचा विकास- आ. मोनिकाताई राजळे

अहिल्यानगर मराठी न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत वाखुरे 

 मा. आ. स्व. बाबूजी आव्हाड स्पोर्ट्स लीगचे उद्घाटन

पाथर्डी : मानवी जीवनात खेळाचे विशेष महत्व असून खेळामुळे न्यूनगंड कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. मोबाईल व सोशल मिडीयाच्या आहारी न जाता प्रत्येकाने किमान एका खेळात प्राविण्य मिळविल्यास खेळातूनही चांगले करियर घडू शकते. किमान आपल्या प्रतिभा शक्तीचा विकास होण्यासाठी तरी प्रत्येकाने खेळले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले. त्या येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजीत तालुकास्तरीय मा. आ. स्व. बाबुजी आव्हाड स्पोर्टस लीग उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर मा. नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, विश्वस्थ नंदुशेठ शेळके, बाळासाहेब कचरे, प्राचार्य डॉ. बबन चौरे, धनंजय बडे, बंडूशेठ बोरुडे, रमेश हंडाळ, बबलू खोर्डे, सचिन वायकर, बाळासाहेब गोल्हार, मच्छिंद्र पवार, सोमनाथ आकोलकर आदी उपस्थित होते.  

आ. मोनिकाताई म्हणाल्या, पार्थ विद्या प्रसारक मंडळ यावर्षी हीरक महोत्सव साजरे करत असून संस्थेसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. बाबूजींचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले असून पाथर्डी तालुक्यात शैक्षणिक क्रांती करण्याचे काम बाबुजींनी केले. दिवसेंदिवस संस्थेची शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता वाढत असून कोमल वाकळे, योगिता खेडकर, हर्षदा गरुड आदी महाविद्यालयाच्या खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा सिद्ध करत आहेत. क्रीडा क्षेत्रात ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे म्हणून आज भारत सरकार खेलो इंडिया, कब्बडी लीग, आयपीएल यासारख्या स्पर्धांना प्रोत्साहन देत असून यातून अनेक ग्रामीण खेळाडू पुढे येत आहेत.पाथर्डीच्या पंकज शिरसाट यांनी कब्बडी खेळात भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाचे नेतृत्व केले आहे. 

यावेळी पाथर्डी तालुका क्रीडा समितीमध्ये अध्यक्षपदी निवड झालेल्या राजेंद्र शिरसाट तसेच सचिव आजिनाथ शिरसाट, सहसचिव एकनाथ पालवे, खजिनदार रामदास दहिफळे व इतर सदस्यांचा सन्मान करण्यात आला. स्पोर्ट लीग मध्ये पाथर्डी तालुक्यातील विविध विद्यालयातील १५२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पोर्ट लीग यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय देशमुख, प्रा. सचिन शिरसाट, रावसाहेब मोरकर, प्रमोद हंडाळ, सतीश डोळे, ज्ञानेश्वर गायके यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बबन चौरे, सुत्रसंचालन प्रा. शेखर ससाणे तर आभार डॉ. विजय देशमुख यांनी मानले.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा