September 20, 2025 12:40 pm

सुशोभीकरणाचे काम पूर्ण होताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण- डाॅ.विखे पाटील 

अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे

 डॉ आंबेडकर स्मारकासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही 

श्रीरामपूर दि.४ (प्रतिनिधी)भाजी मंडई येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे स्मारक येत्या एका महिन्यात शिवप्रेमींसाठी खुले करण्यात येणार असून, या पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी श्रीमंत खा. उदयनराजे भोसले यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

श्रीरामपूर दौऱ्या दरम्यान डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजी मंडई येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्मारक आणि सुशोभीकरणाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.डॉ विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.यावेळी शिवप्रेमी नागरिक व स्मारक समितीचे सदस्य उपस्थित होते. स्मारकाचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना समितीला दिल्या.

 जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा भव्य पुतळा उभारला जात असून, शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेता स्मारक वेळेत पूर्ण करून लवकरच जनतेसाठी खुले करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीरामपूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागत आहे. या पुतळ्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आल्याची घोषणा खा डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

या दौऱ्यात त्यांनी रेल्वे स्थानक शेजारी प्रस्तावित जागेची पाहणी केली याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी आराखडा येत्या आठवड्यात सादर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

“अधिकाऱ्यांनी समितीच्या समन्वयातून काम पूर्ण करण्याचे त्यांनी सूचित केले.

अहिल्यानगर येथे उभारलेल्या आंबेडकर स्मारकाच्या धर्तीवरच श्रीरामपूर येथेही भव्य स्मारक साकारले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, स्मारकाचे काम पुढील आठ ते नऊ महिन्यांत पूर्ण करून त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

श्रीरामपूर तालुक्यात मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा