September 20, 2025 7:59 pm

अहिल्यानगर जिल्ह्यातील रेशन दुकानांवर लागणार क्यूआरकोड ! रेशन कार्डमध्ये नाव जोडणे व इतर कामे होणार सोपे

अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांसाठी पुरवठा विभागाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेशन कार्ड मधील नाव कमी करणे नवीन नाव जोडणे यांसारखे अनेक कामे नागरिकांना घरबसल्या करता येणार आहेत.

खरे तर महाराजस्व अभियानाचा तिसरा टप्पा सुरू आहे आणि या तिसऱ्या टप्प्यातील सेवा पंधरवड्यात पुरवठा विभागात पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक कामे केली जाणार आहेत.

यात स्वस्त धान्य दुकानात हक्काचे धान्य मिळते का, रेशन दुकानदाराकडून सन्मानाची वागणूक मिळते का, ग्राहकाला आलेला अनुभव क्यूआर कोडच्या माध्यमातून शासनाला कळवला जाणार आहे.

यासोबतच रेशन कार्ड मधील नाव कमी करणे नाव जोडणे ही कामे सुद्धा आता घरबसल्या होणार आसल्याने तहसील कचेरीत हेलपाटे कमी होणार आहे. यासाठी रेशन दुकानावर चार प्रकारचे क्यू आर कोड लावले जातील अशी माहिती समोर आली आहे. नक्कीच हा निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासादायी राहणार आहे.

रेशन दुकानाला रेटिंग देण्यासाठी सुद्धा क्यूआर कोड राहणार आहे. ग्राहकांना दुकानात कशी वागणूक मिळाली, जास्त पैसे घेतलेत का, काटामारी करण्यात आली का? याबाबत या माध्यमातून शासनाला माहिती देता येणार आहे.  

रेशन दुकानातील धान्य वितरणाची माहिती देण्यासाठी सुद्धा एक क्यूआर कोड असेल. हा कोड स्कॅन करून हक्काचे धान्य मिळतेय का ? वितरणाची तारीख, प्रमाण, पात्रता तपासणे शक्‍य होणार आहे.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा