अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
लोणी प्रतिनिधी : लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराज मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. यापूर्वीही या मंदिरातून दानपेटी फोडण्यात आली होती. पुन्हा अशीच घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. चोरीचा तपास सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सुरू असून परिसरातील फुटेज तपासले जात आहेत. ग्रामस्थांनी मंदिर परिसरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.
चोरट्याने कुलूप तोडून दानपेटीतील एकूण अंदाजे रक्कम सहा हजार रुपये चोरून घेऊन गेले असल्याबाबतची फिर्याद सुरेश धावणे यांनी लोणी पोलीस स्टेशन मध्ये दिली. लोणी पोलिसांनी अज्ञात चोरटेविरुद्ध भारतीय न्याय व्यवस्था कलम न्याय संहिता कलम 305 (D),331 (4) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास लोणी पोलीस करत आहेत.