September 11, 2025 1:16 pm

पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १४ शाळा होणार डिजिटल – आमदार काशिनाथ दाते सर

पारनेर : गणेश वाघ

पारनेर : तालुक्यातील १४ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा ‘डिजिटल’ करण्यासाठी ३७ लक्ष ८० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती

 आमदार काशिनाथ दाते सर यांनी दिली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२४- २०२५ या वर्षाच्या डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत राखीव असलेल्या निधीतून पारनेर तालुक्यातील १४ जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी ३७ लक्ष ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. १४ शाळांना प्रत्येकी २ लक्ष ७० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

जिल्हा परिषद शाळांना शहरी भागाच्या धर्तीवर शैक्षणिक सुविधा असलेल्या साधनांचा उपयोग करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे एक आधुनिक स्वरूप प्राप्त होऊन इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे.

  डिजिटल स्कूल मुळे शिक्षणाचे एक आधुनिक स्वरूप प्राप्त होऊन इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार असून सध्या स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत शाळा डिजिटल झाल्यावर शाळेची गुणवत्ता व मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारून स्पर्धेच्या युगात त्यांना अधिक भरारी घेता येईल, अशी अपेक्षा आमदार काशिनाथ दाते सर यांनी यांनी व्यक्त केली.

या शाळा होणार डिजिटल…! 

१) जि. प. प्रा. शाळा ढोकी ( निधी – २ लक्ष ७० हजार) 

२) जि. प. प्रा. शाळा पिंप्री गवळी ( निधि – २ लक्ष ७० हजार ) 

३ जि. प. प्रा. शाळा पळवे बुद्रुक ( निधी – २ लक्ष ७० हजार) 

४) जि. प. प्रा. शाळा धोत्रे बुद्रुक ( निधी – २ लक्ष ७० हजार) 

५) जि. प. प्रा. शाळा खडकवाडी ( निधी – २ लक्ष ७० हजार) 

६) जि. प. प्रा. शाळा सारोळा अडवाई ( निधी – २ लक्ष ७० हजार) 

७) जि. प. प्रा. शाळा पळसपुर ( निधी – २ लक्ष ७० हजार) 

८) जि. प. प्रा. शाळा पिंप्री जलसेन

( निधि – २ लक्ष ७० हजार) 

९) जि. प. प्रा. शाळा म्हसोबा झाप 

( निधि – २ लक्ष ७० हजार) 

१०) जि. प. प्रा. शाळा डोंगरवाडी ( निधी – २ लक्ष ७० हजार) 

११) जि. प. प्रा. शाळा चिंचोली ( निधी – २ लक्ष ७० हजार) 

१२) जि. प. प्रा. शाळा गारखिंडी ( निधी – २ लक्ष ७० हजार) 

१३) जि. प. प्रा. शाळा हत्तलखिंडी ( निधी – २ लक्ष ७० हजार) 

१४) जि. प. प्रा. शाळा गटेवाडी ( निधि – २ लक्ष ७० हजार)

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें