अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे
दि.०७, अहिल्यानगर : अखिल भारतीय पारनेर तालुक्यातील ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व समता सैनिकांची महात्मा फुले समता परिषद आढावा बैठक पारनेर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव लोंढे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली.
यावेळी पारनेर तालुका अध्यक्ष नवनाथ खामकर यांनी गाव तिथे समता परिषद घर तेथे समता सैनिक अशी संकल्पना राबवून सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधण्याचे आवाहन केले व लवकरच तालुक्यात गावानिहाय समता परिषदेचे आढावे घेण्यात येणार
गाव तिथे समता परिषदेची शाखा स्थापन करण्याचा निर्धार असल्याचे सुतोवाच खामकर यांनी केले. तर जिल्हाध्यक्ष सुभाषराव लोंढे यांनी समता संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या अडचणी सोडवून ओबीसींच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी भुजबळ यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.
या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर सखोल संवाद साधत, संघटनेच्या भविष्यातील वाटचालीमते जाणून घेतली. समता, सामाजिक न्याय आणि संघटन बळकटीकरणा च्या दिशेने निर्धार अधिक दृढ करावा, तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी व संघटनेचे कार्य सर्व सामान्यां पर्यंत पोहचवण्यासाठी, प्रत्येक समतासैनिकाने जबाबदारीने आणि झोकून देऊन काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.या बैठकीत ओबीसी संघटनाचे पदाधिकारी व समता सैनिकांकडून आलेल्या सखोल मार्गदर्शक आणि सूचना हे संघटनेच्या रचनात्मक भविष्याचा मार्ग उजळवणारे आहेत. या सूचनांचा योग्य अभ्यास करून त्यांचा अंमल करण्यात येईल. याची खात्री ही यावेळी देण्यात आली.
ही बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर, बबनराव चौरे, समता परिषदेचे पारनेर तालुका अध्यक्ष नवनाथ खामकर, बबनराव घुमटकर, वसंत रांधवण, अनिल गाडिलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी संदिप रासकर, संतोष खाडे, किरण जमदाडे, विशाल क्षीरसागर, आर्यन शिंदे, तन्मय खामकर, संतोष खामकर, हनुमंत खामकर, प्रभाकर घोलप, विजय मंडलिक, बाळासाहेब मंडलिक, अशोक खामकर, आबासाहेब खामकर, रामदास खामकर, रामदासखामकर, आकेश जमदाडे, किशोर मेहेर, यश रसाळ, धनंजय मेहेर, तात्याभाऊ मेहेर, दत्तात्रय जमदाडे, निखिल जम दाडे, अविनाश लोखंडे, गणेश नगरे, पोपट खेडकर, सुनील नगरे, कृष्णा तारडे, गोकूळ रासकर, बाळासाहेब रासकर, शंकर गरगटे, शंकर रासकर, जालिंदर नरड, गणेश व्यवहारे, गुलाबराव गायकवाड, पोपट रासकर आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.