अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
सात्रळ प्रतिनिधी (अनिल वाकचौरे ) : ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी लोक आपली घरे सजवतात आणि मशिदीत नमाज अदा करण्यासाठी जातात. या दिवशी दर्ग्यात चादरही अदा केली जाते. ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या दिवशी बहुतेक वेळ अल्लाहच्या इबादतीत घालवला जातो. तसेच, या दिवशी मिरवणुका काढल्या जातात आणि लोक एकमेकांना मिठी मारून एकमेकांना शुभेच्छा देतात.
गणेश उत्सवामुळे राहुरी तालुका पोलीस स्टेशन यांनी केलेलं आव्हानास प्रतिसाद देत सात्रळ सोनगाव पंचक्रोशी मुस्लिम बांधवांनी ईदची मिरवणूक शुक्रवारी न काढता सोमवारी काढण्या चा निर्णय घेऊन सात्रळ सोनगाव पंचक्रोशी गावातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती.
यावेळी सोनगाव पंचक्रोशी मधील सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते. या मिरवणूकित रथ,घोडे यांचे मुख्य आकर्षण होते मिरवणुकी नंतर संध्याकाळी नमाज व प्रवचन व महाप्रसाद देण्यात आला.