अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे
राहूरी प्रतिनिधी : राहुरी शहरातील मानाचा गणपती असलेल्या आझाद गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचा शुभारंभ तहसीलदार पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फीत कापून व आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली.
यावेळी श्रीरामपूर पोलीस उपविभागीय अधिकारी भवर साहेब, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब आणि अँड. राहुलभैय्या शेटे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार पाटील साहेब यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली आणि त्यानंतर गणेश भक्तांच्या जयघोषात मिरवणुकीचा मार्ग मोकळा झाला.
राहुरी शहरात आझाद गणेश मंडळाचा गणपती मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. यंदाही मोठ्या उत्साहात आणि शांततेत बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे मिरवणुकीतील शिस्त आणि सुरक्षितता अधिक सुनिश्चित झाली.