अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
दिघोळ गणातून पंचायत समिती साठी मा. उपसरपंच आप्पासाहेब ढगे इच्छुक
जामखेड प्रतिनिधी – सुनिल गोलांडे :पाटील आपटी गावातील युवा नेते भाजपा युवा मोर्चाचे कोषाध्यक्ष माननीय आप्पासाहेब रमेश ढगे यांच्या कुशल मार्गदर्शन खाली महिलांसाठी मोफत पंढरपूर मोफत महिलांसाठी देवदर्शन चे आयोजन केले.आप्पासाहेब ढगे हे प्रत्येक समाज कार्यात अग्रेसर असतात.सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असते.
शेतकऱ्यांचे,सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्या साठी नेहमी तत्पर असतात. त्याच बरोबर त्यांना सांप्रदायिक क्षेत्राची आवड असल्यामुळे ते नेहमी अग्रेसर असतात. सर्व सामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडलेली आहे.
विधानपरिषदेचे सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे साहेब यांचा माध्यमातून गावात विविध विकास कामे मंजूर करून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न शिल असतात.
पक्षाचा भाजपा प्रसिद्ध प्रमूख, सोशल मीडिया जिल्हासह सायोंजक ,आपटी गावचा बिनविरोध उपसरपंच पदाचा मान त्यांनी पटकवलेला आहे.
सोशल मीडिया पदावर असताना त्यांनी पक्षाचा पडतीच्या काळात आपल्या सोशल मीडिया पदाचा वापर करून ठाम भूमिका निभावली.
ना.प्रा.राम शिंदे साहेब व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय काशिद यांचे ते.एक निष्ठ सहकारी म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे.आगामी पंचायत समिती निडणुकीचा औचित्य साधूनत्यांनी तयारी सुरू केली आहे.
ते सांप्रदायिक क्षेत्रात तत्पर असल्यामुळे त्यांनी पंढरपूर देव दर्शनाचा योग जुळून आणला याबद्दल महिलांमध्ये उत्साहच वातावरण निर्माण झाले आहे.