लोणी :शहाजी दिघे
लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी ची इयत्ता पहिलीची तन्वी अमित विलायते ही देववानी संस्कृत श्लोक ऑलिंपियाड स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झाली.
तन्वी ही डॉ.सोनाली विलायते व डॉ.अमित विलायते यांची जेष्ठ कन्या आहे.
देववाणी संस्कृत श्लोक ऑलिंपियाड ही संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्कृत संवर्धनासाठी कार्य करणारी संस्था असून संपूर्ण भारतभर व इतर आठ देशातून हजारो विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात अशाच या स्पर्धेत १० लेवल असतात.
२०२३ मध्ये या स्पर्धेत तन्वीची चौथी लेवल पूर्ण होऊन त्यात तिचा प्रथम क्रमांक आला आणि २०२४ मध्ये झालेल्या सहाव्या लेवलवर तिला प्रथम क्रमांक मिळाला अशी माहिती प्राचार्य सीमा बढे यांनी दिली. तिच्या या यशाचे संस्थेचे प्रमुख जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्मिता विखे सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालिका लीलावती सरोदे, प्राचार्य भारती कुमकर,सीमा बढे ” अहिल्यानगर मराठी न्यूज ” या डिजिटल वृत्तपत्राचे संपादक शहाजी दिघे,आई वडील,आजी आजोबा, वर्गशिक्षक तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले. समाजातील सर्व स्तरातून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.