September 21, 2025 3:35 am

कोपरगाव उप जिल्हा रुग्णालयात पूर्णवेळ महिला डॉक्टर नेमणुकीची गरज : महिलांच्या आरोग्य समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी तीव्र

अहिल्यानगर मराठी न्युज : प्रशांत टेके

कोपरगाव – कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याला काही काळ झाला असला तरी, अजूनही या ठिकाणी आवश्यक त्या आरोग्य सेवा अपुऱ्या आहेत. विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत, याकडे स्थानिक नागरीकांनी आणि महिला संघटनांनी लक्ष वेधले आहे.

मागील काही वर्षांपासून बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आणि चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे महिलांमध्ये विविध प्रकारचे गुंतागुंतीचे आजार वाढले आहेत. अशा परिस्थितीत महिलांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागते, जिथे उपचाराच्या नावाखाली आर्थिक शोषण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.

तपासण्यांमध्ये अनावश्यक खर्च लादणे, विशिष्ट तपासणी केंद्रांवर जोर देणे, औषधांसाठी ठराविक मेडिकल दुकाने सुचवणे हे प्रकार सर्रास घडत आहेत. किरकोळ आजारांसाठीही अनेक वेळा महागड्या तपासण्यांची शिफारस केली जाते, ज्यामुळे रुग्णांचे आर्थिक नुकसान होते.

गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी पूर्वी बीड जिल्ह्यातील गाजलेली प्रकरणे सर्वांना ठाऊक आहेत. आजही काही ठिकाणी महिलांच्या अशा संवेदनशील आरोग्य समस्यांवर व्यावसायिक दृष्टिकोनातून फसवणूक केली जात असल्याचे समोर येत आहे. मोफत शिबिरांमध्येही प्राथमिक तपासण्या करून महागड्या रुग्णालयांमध्ये पाठवण्याचे प्रकार घडत असल्याचे महिलांनी सांगितले.

अलीकडे कोपरगाव तालुक्यात उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर महिलांच्या आरोग्य व्यवस्थेबाबत अनेक आरोप प्रत्यारोप झाले. बाळंतपणाच्या बाबतीतही कोपरगावमध्ये अनावश्यक सिझेरियन शस्त्रक्रियांचा सल्ला दिला जातो, मात्र प्रवरा हॉस्पिटल, शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटल, एसजेएस रुग्णालय यांसारख्या ठिकाणी नॉर्मल डिलीव्हरीचे प्रमाण जास्त असल्याचे स्थानिक नागरिकांचे निरीक्षण आहे.

या पार्श्वभूमीवर कोपरगाव उप जिल्हा रुग्णालयात तातडीने पूर्णवेळ महिला डॉक्टरची नेमणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीने महिलांना कमी खर्चात, विश्वासार्ह आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळू शकतील. महिलांच्या आरोग्याच्या संवेदनशीलतेचा विचार करता हा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी कोपरगावच्या नागरिकांकडून केली जात आहे.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा