September 21, 2025 3:33 am

राहूरी कृषी विद्यापीठ येथील भारतीय स्टेट बँकेत 70 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

अहिल्यानगर मराठी न्युज :शहाजी दिघे

राहूरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ११ जून रोजी भारतीय स्टेट बँकेच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक, विद्यापिठातील कर्मचारी, अधिकारी, सुरक्षा रक्षक विद्यार्थ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिराचे उद्घाटन एसबीआयचे शाखा प्रबंधक नवाज देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बँकेचे प्रवीण रक्ताटे, प्रतीक अभंग, सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे, दत्तात्रय अडसूरे, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरात ५० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. तसेच प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान केल्यानंतर शाखा प्रबंधक नवाज देशमुख यांच्यावतीने टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले. रक्तसंकलनाचे कार्य संगमनेर येथील अर्पण रक्तपेढीच्या वैद्यकीय पथकाने पार पाडले. या उपक्रमामुळे गरजूंना वेळेवर रक्त मिळण्यास मदत होणार असून समाजात सामाजिक बांधिलकी जपली जाईल, असे मत शाखा प्रबंधक नवाज देशमुख यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या एसबीआय शाखेचे प्रबंधक नवाज देशमुख, कर्मचारी रामदास मामा उनवणे, चंद्रकांत साळवे मेजर, राजेंद्र कोहकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा