September 21, 2025 3:35 am

सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुलात नवागतांचे स्वागत

अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे

सात्रळ: राहुरी तालुक्यातील सात्रळ रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इ.५ वी ते १०वी अखेर सर्व नवगतांचे स्वागत आनंददायी वातावरणात करण्यात आले.

   याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक जय बाबाची पत्रकार अनिल वाकचौरे, पर्यावरण प्रेमी पंकज कडू पाटील, संकुलाचे प्राचार्य सिताराम गारुडकर, पर्यवेक्षिका हेमलता साबळे, भाऊसाहेब पेटकर, भास्कर गोसावी यांच्या शुभहस्ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, तसेच थोर स्वातंत्र सेनानी कॉ.पी.बी. कडू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. 

यावेळी पंकज कडू पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातील अनुभव सांगत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 

सर्व शिक्षण अभियानांतर्गत मोफत पाठ्य पुस्तकांचे वितरण व नवनाथांचे स्वागत मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

     त्याचप्रमाणे प्रा. पंकज दिघे, भारत कोहकडे, प्रकाश कुलथे, विलास गभाले, प्रा.अर्चना बनसोडे, पल्लवी गावडे,या शिक्षकांच्या बदल्या दुसऱ्या शाळेत झाल्याने त्यांना निरोप पुढिल कार्यास शुभेच्छा देत त्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभागप्रमुख विलास गभाले नियोजन यांनी केले. तर ज्येष्ठ शिक्षक त्रिंबक राशिनकर, सतीश नालकर, प्रकाश कुलथे, प्रा. विलास दिघे, प्रा. सतीश कदम.प्रा. पंकज दिघे, प्रा. अण्णासाहेब गोर्डे, भारत कोहकडे, वैभव वसावे, संजय दिघे,ज्ञानदेव लेंडे, सुदर्शन गिते, सुमेश शिंदे, देविदास थोरात, कावेरी वदक, सुनिता ढोकणे, गीतांजली गोसावी, पल्लवी गावडे, प्रवीणताई दिघे, प्रा.अर्चना बनसोडे, रत्नाकर सोनवणे, दत्ता शिंदे, ज्ञानदेव माळी, रामदास साबळे, राजू पेटारे, आदींनी परिश्रम घेतले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गभाले यांनी केले तर आभार त्रिंबक राशिनकर यांनी मानले.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा