अहिल्यानगर मराठी न्यूज : शंकर सोनावणे
लोणी : लोणी पोलीस स्टेशन गुन्हा. रजिस्टर नंबर ४८/ २०२१ भादवि कलम ३७६ए ,बी सह पोक्सो कलम ४, ८, १२ प्रमाणे मधील आरोपी *नामे जालिंदर तुळशीराम वांगे ,वय ३८ वर्ष रा – निर्मळ पिंपरी ,तालुका -राहता ,जिल्हा- अहिल्यानगर यास मा.गुप्ता साहेब,सत्र न्यायालय राहाता,यांनी पोक्सो कलम ८ प्रमाणे पाच वर्ष कारावास व १० हजार रु.दंड तसेच पोक्सो कलम १२ प्रमाणे तीन वर्ष शिक्षा अशी शिक्षा सुनावली* असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी, तत्कालीन नेम.लोणी पोलीस स्टेशन यांनी केला असून सरकारी वकील म्हणून शासनातर्फे मा.अँड.बी.डी.पानगव्हाणे साहेब, यांनी बाजू मांडली तसेच, कोर्ट पैरवी म्हणून ए. ए. आय दिलीप बुगे ,नेम .लोणी पोलिस स्टेशन यांनी काम पाहिले आहे.
सदर ची कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे,पोलिस अधिक्षक, अहिल्यानगर, मा.अपर पोलिस अधीक्षक ,श्री.सोमनाथ वाघचौरे,श्रीरामपूर विभाग, एस. डी. पी. ओ मा.श्री.शिरीष वमने,शिर्डी उपविभाग,API कैलास वाघ,लोणी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे..