September 20, 2025 11:07 am

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा शिर्डी ते श्रीनगर एक राखी जवानांसाठी रक्षा रथ रवाना

अहिल्यानगर मराठी न्यूज : प्रशांत टेके

संजीवनी युवा प्रतिष्ठान सिमेवरील सैनिकांना एक लाखाहून अधिक ‌राख्या घेऊन जाणार

कोपरगाव : संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित एक राखी जवानांसाठी या उपक्रमासाठी देशातील विविध ठिकाणांहून राखी संकलन करण्यात येणार आहे. यासाठी शिर्डी ते श्रीनगर रथ यात्रेचे आज शिर्डी येथून प्रस्थान झाले. या प्रसंगी अतिथी म्हणून शिर्डी संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने हजर होते.संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे आणि संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.मान्यवरांनी तिरंगा ध्वज दाखवून या राखी यात्रेला प्रारंभ केला आणि शुभेच्छा दिल्या.

संजीवनी युवा प्रतिष्ठान गेले दहा वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. एक राखी जवानांसाठी हा उपक्रम गेली पाच वर्ष मोठ्या उत्साहात राबवला जातो. या वर्षी एक लाखाहून अधिक राख्या शिर्डी ते श्रीनगर राखी यात्रेत जमा होणार असून त्या सैनिक बांधवांना सीमेवर रक्षाबंधनानिमित्त पोहोचविण्यात येत आहे या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले साईबाबांच्या भूमीमध्ये अनेक क्रांतिकारकांनी आशीर्वाद घेतले आहेत व शिर्डी सारख्या भूमीत अनेक स्वातंत्र्य सैनिक घडले आहेत त्यामुळे देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना साईबाबांच्या नगरीतून सुरुवात झालेली ही रथयात्रा सहा राज्यातून प्रवास करणार असून पंचिवस मोठ्या शहरांमध्ये या यात्रेचे स्वागत होणार असल्याचे कोल्हे म्हणाले.

याप्रसंगी विविध मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त करत संजीवनी युवा प्रतिष्ठानचा हा उपक्रम कौतुकास्पद असून भविष्यात देखील अविरतपणे सुरू राहावा. साईबाबांच्या पावनभूमीतून या उपक्रमाची यावर्षी झालेली सुरुवात ही निश्चितच भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात पुढे जाईल असा आशावाद व्यक्त झाला. विवेकभैय्या कोल्हे यांनी भविष्यकाळात देखील एक राखी जवानांसाठी हा उपक्रम शिर्डी ते श्रीनगर कायमस्वरूपी सुरू ठेवावा अशी मागणी देखील शिर्डी येथील नागरिकांनी केली.साई मंदिरात राखी बाबांच्या चरणाला स्पर्श करून राखी संकलनाला सुरुवात करण्यात आली.संजीवनी सैनिकी स्कूल बँड पथकाने अतिशय प्रभावी देशभक्तीचे गीत वाजवत वातावरण अतिशय ऊर्जापूर्ण केले होते.

या वेळी ॲड. शिवाजीराव कोते, शिवाजीराव गोंदकर, दिलीपराव गोंदकर, महेंद्र शेळके, सखाराम चौधरी, गणेश कारखाना चेअरमन सुधीरराव लहारे, विजयराव दंडवते व संचालक मंडळ, सचिन कोते, रामचंद्र बोठे, उत्तमराव मते, रमेश गागरे, भारतराव तुरकने, सचिन कोते, चंद्रभान धनवटे, राजेंद्र लहारे, डॉ. वसंतराव लभडे, ॲड. लोंढे, अण्णासाहेब वाघे, भाऊसाहेब थेटे, अविनाश दंडवते तसेच क्षेत्र शिर्डी व पंचक्रोशीतील विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजीवनी सैनिकी स्कूलचे बँड पथक या उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण ठरले. राज्य आणि देशपातळीवर हे बँड पथक नावाजलेले असून अव्वल समजले जाणारे दर्जेदार सादरीकरण सैनिकी स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी केले त्यांचे मार्गदर्शक शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा