अहिल्यानगर मराठी न्यूज : संपादक शहाजी दिघे
सात्रळ, प्रतिनिधी (अनिल वाकचौरे) : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सात्रळ, ता. राहुरी येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव पाटील यांचा १२५ वा. जयंती समारंभ सात्रळ शैक्षणिक संकुलात वैचारिक जागर करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थिनींनी काढलेली ‘सहकाराची परंपरा चित्रीत’ करणारी रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ‘दुर्गवैभव’ या पुस्तकाचे लेखक श्री. श्रीकांत कासट हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. श्री. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील होते. याप्रसंगी कु. सायली हारदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे संचालक श्री. नंदकिशोर नावंदर व सौ. नावंदर, श्री. सुभाष जनाजी अंत्रे, कारखान्याचे संचालक श्री. सुभाष नामदेव अंत्रे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. जे. पी. जोर्वेकर, श्री. राजेंद्र आनाप, श्री. परसराम साबळे, पत्रकार श्री. अनिल वाकचौरे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, कार्यालय अधीक्षक श्री. अनिल गागरे, श्री. महेंद्र तांबे उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अहिल्यानगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार प्राप्त संगमनेर येथील ‘दुर्गवैभव’ या पुस्तकाचे लेखक श्री. श्रीकांत कासट मार्गदर्शन करताना म्हणाले,” शिवकाल हा प्रेरणादायी आहे. इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि महाराष्ट्राचा समृद्ध वारसा अनुभव इच्छिणाऱ्या पर्यटकांनी हे दुर्गवैभव नक्की अनुभवावे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक इतिहासाचे दुर्गवैभव हे साक्षीदार आहेत. पद्मश्रींचे सहकाराचे कार्यही यासम आहे. सहकाराचे विकास कार्य दुर्गवैभवा सारखेच अक्षर आहे.”
कार्यक्रमाचे आभार प्रो. (डॉ.) आर.डी.बोरसे यांनी मांडले सूत्रसंचालन प्रा. आदित्य आगरकर व प्रा. एस. जी. दिघे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा. राहुल कडू, प्रा. आदिनाथ दरंदले, डॉ. एकनाथ निर्मळ , सेवक वृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.