September 19, 2025 5:04 pm

युवकांनो देशासाठी योगदान द्या -ॲड. श्री. आप्पासाहेब पाटील दिघे 

अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे

धानोरे, दि.१५: वर्तमान काळात भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची गौरवशाली यशोगाथा अधिक प्रकाशमान होत आहे. सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि लोकसाहित्य दृष्टिकोनातून जागतिक स्तरावर भारत हा अनुकरणीय देश ठरत आहे. युवकांनो स्वतःची प्रगती करा, समाज, राष्ट्र व देश उभारणीसाठी योगदान द्या, असे मत प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक मा. ॲड. श्री. आप्पासाहेब पाटील दिघे यांनी केले.

     राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील प्रवरा शैक्षणिक संकुलातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. पांडुरंग पाटील दिघे हे उपस्थित होते. याप्रसंगी उपप्राचार्य, प्राध्यापक, सुरक्षा अधिकारी व कर्मचारी वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

        यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तिरंगा राष्ट्रध्वज घेतलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमाचे संयोजन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. मधुकर वाणी यांनी केले.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें