अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
सोनगाव प्रतिनिधी(अनिल वाकचौरे ) : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील आपल्या भारत देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज भारत देश सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करताना दिसतोय जगामध्ये भारताची नोंद घेतली जाते सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून जागतिक स्तरावरती आपल्या पंतप्रधानाचे नाव आहे आतापर्यंत सत्तावीस देशांनी सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आपल्या मोदीजी़ना दिलेला आहे अशा सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास या चतु:सूत्रावर काम करणाऱ्या देशाच्या यशस्वी पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त द्वारकामाई फाउंडेशन पंचक्रोशी च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सात्रळ येथे वहया वाटप करण्यात आले.
यावेळी द्वारकामाई फाउंडेशनचे सदस्य नारायणराव धनवट , मच्छिंद्र अंत्रे, मोहम्मद तांबोळी, रविंद्र दिघे , विजय निधाने, दौलत कडू, बाबासाहेब शिंदे , शाम वामन , अनिल वाघचौरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षका उपस्थित होते.