अहिल्यानगर मराठी न्यूज : संपादक शहाजी दिघे
सात्रळ प्रतिनिधी (अनिल वाकचौरे ) : राहुरी तालुक्यातील रयत शैक्षणिक संकुल,सात्रळ येथे ७९वा स्वातंत्र्यदिन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. अरुण कडू पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी थोर स्वातंत्र्य सेनानी मा.आमदार काँ.पी.बी कडू पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आजच्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण केले उपस्थितांना मार्गदर्शन करताना अरुण पाटील यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अविरत परिश्रम व बलिदान केलेल्या भारतमातेच्या महान सुपुत्राचे स्मरण करुन अभिवादन केले. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि आजच्या पिढीने स्वातंत्र्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वातंत्रप्राप्तीनंतर योग्य त्या विचारमंथनातून योग्य वाटचाल करुन आपल्या देशाला विकसित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले .यावेळी मान्यवरांच्या हस्ते रयत शैक्षणिक संकुलातील श्रीम. कोंडाबाई नानासाहेब सहादू कडू पाटील कन्या विद्यालय , सात्रळ व नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय , सात्रळ या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्कूल कमिटी चेअरमन ॲड.विजयराव कडू पा, स्कूल कमिटी सदस्य मा.किरण कडू पा. माजी उपसरपंच जयवंत दिघे पा.सोसायटी चेअरमन मा. दिनकर कडू ,सोसायटी संचालक योगेश चोरमुंगे पा.शांतिभाई गांधी, मन्सूरभाई तांबोळी , नारायण सिनारे,बाळकृष्ण चोरमुंगे पा., प्रमोदकाका कुळकर्णी, पत्रकार किशोरशेठ भांड, भाऊसाहेब पलघडमल, गुरुमुखदास हिरानंदानी दामोदर जगताप,बाजीराव दिघे पा भास्कर सोना पलगडमल .आजिम तांबोळी, अहमदभाई शेख माजी प्राचार्य के. डी.तांबोळी, माजी.प्राचार्य सिराज मन्सूरी रयत संकुलाचे प्राचार्य मा. सिताराम गारुडकर श्रीम. कोंडाबाई नानासाहेब सहादू कडू पाटील कन्या विद्यालय, सात्रळ मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, पर्यवेक्षिका सौ हेमलता साबळे,बापूजी सहादू कडू पा ज्युनिअर कॉलेजचे प्रा.विलास दिघे ,कॅथोलिक शाळा सात्रळ मुख्याध्यापिका साळवे मॅडम ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सात्रळ मुख्याध्यापिका सौ खराडे , उर्दू शाळा सात्रळ मुख्याध्यापक श्री राऊत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडू वस्ती मुख्याध्यापक सजन आदी मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रम पार पाडण्यासाठी रयत संकुलातील सर्व शिक्षक व सेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पलघडमल, राम तांबे यांनी तर आभार मुख्याध्यापिका ब्राह्मणे मॅडम यांनी मानले.व जिल्हा परिषद मराठी शाळा. आनंद गुरुकुल ग्रामपंचायत धानोरे,सात्रळ, सोनगाव ग्रामपंचायत याही ठिकाणी ध्वजवंदनचा कार्यक्रम पार पडला