September 19, 2025 3:27 pm

 ‘अहिल्यानगर जिल्ह्यातील सोळाशे जनावरांना लम्पीची बाधा’; पोळा सणावर संकट 

 अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे

धानोरे : जनावरांना होणाऱ्या ‘लम्पी स्कीन’च्या वाढत्या बाधेमुळे शेतकरी धास्तावले असुन जिल्ह्यात आजवर तब्बल सोळाशेहून अधिक जनावरे बाधित झाली असून त्यातील १ हजार ४० बरी झाली आहेत.

अशातच २२ ऑगस्ट रोजी बैलपोळा सण साजरा होणार आहे. या दिवशी बैल एकत्र करून साजरा केल्यास किंवा शर्यतीचे आयोजन झाल्यास लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सर्व पशुपालकांनी साध्या पद्धतीने सण साजरा करण्यासाठी दक्षता घ्यावी.

राज्यात सर्वाधिक जनावरे अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. २०१९ गणनेनुसार १५ लाख जनावरे आहेत. लम्पीचा आजार जनावरांना होत असला तरी वाढत्या प्रभावामुळे शेतकऱ्यांच्या पोटात खड्डा पडतो आहे.लम्पी स्किन आजार दुधाळ जनावरांना बाधा करतो. दूध व्यवसायावर परिणाम होत आहे.

सोळाशे जनावरे बाधित आहेत. सर्वाधिक प्रभाव राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, नेवासे तालुक्यात आहे. बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर अंतरावर नियंत्रित क्षेत्र केले आहे. शेतकऱ्यांनी जनावरांच्या गोठ्यात फवारणी करून घ्यावी. दवाखान्यात बाधित जनावरांना उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी दशरथ दिघे यांनी केले आहे.

लशीनंतरही लागण

लम्पी आजाराने सर्वाधिक गायी त्रस्त आहेत. त्यानंतर वासरांना प्रादूर्भाव होतो आहे. बैल आणि म्हशींना फारशी बाधा नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ४७ जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यात तब्बल १४ लाख जनावरांना लस दिली आहे. तरीही जनावरे बाधित होत आहेत. ही लस शेळ्या-मेंढ्यांसाठी आहे. त्यामुळे तिचा जनावरांना फारसा लाभ होत नाही. लम्पीवरील लसीवर काम सुरू असल्याचे माहिती मिळत आहे 

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें