अहिल्यानगर :प्रतिनिधी
अहिल्यानगर : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर हे मागील काही महिन्यांपासून अंतराळात अडकून पडले आहेत.त्यांच्या यानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आता त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मार्च महिन्यात हे दोघेही पृथ्वीवर उतरणार आहेत.
नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. परंतु, त्यांना अंतराळात जाऊन आता आठ महिने उलटून गेले आहेत.यानात बिघाड झाल्याने त्यांना परत येण्यासाठी त्डचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र सीएनएनशी साधलेल्या संवादात सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी बॅरी विल्मोर यांनी क्रू १० मिशन १२ मार्चला पृथ्वीतलावर लॉन्च करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच, १९ मार्च रोजी ते त्यांच्या घरी परततीलक्रू १० मिशनमध्ये नासामधील ४ अंतराळवीर असणार आहे. अॅने मॅकक्लेन, निकोल अयेर्स, जपान एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सीचे अंतराळवीर ताकुया ओनिशी,रॉसकॉसमॉस कॉसमॉनट किरील पेस्कॉव हे या मिशनमध्ये सहभागी आहेत. सहा महिन्यांच्या मोहिमेसाठी ते अंतराळात जाणार आहेत. क्रू-१० च्या आगमनानंतर, दोन्ही अंतराळवीर आठवडाभर चालणाऱ्या हस्तांतरण प्रक्रियेत सहभागी होतील. त्यानंतर एक नवीन अंतराळ स्थानक कमांडर पदभार स्वीकारेल. सध्या,सुनीता विल्यम्स या फ्लाइंग लॅबोरेटरीच्या कमांडर आहेत.,असं सांगितले आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी गेल्या वर्षी ५ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या बोईंग स्टार लाइनरमध्ये उड्डाण केले होते.तेव्हापासून अंतराळयानातील तांत्रिक अडचणींमुळे ते अडकले आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे एलॉन मस्क यांना अंतराळातून या अंतराळवीरांना घेऊन येण्यास सांगितले आणि त्यांच्या परतीची त्वरित सोय करण्याची विनंती केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.