September 21, 2025 4:01 pm

उष्णतेच्या तीव्रतेमुळे साई भक्तांना उष्णते पासून होणारे त्रास कमी करावा निलेश शिंदे पाटील 

शिर्डी:राहुल फुंदे

शिर्डी : सध्या शिर्डी व परिसरात तापमान ४२ ते ४७ अंश सेल्सिअस इतके वाढले आहे. या प्रचंड उष्णतेमुळे श्री साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना, तसेच जेष्ठ नागरिक व दिव्यांग भाविकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, भाविकांच्या सोयीसाठी व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खालील उपाययोजना तातडीने राबविण्याची विनंती करत आहे:

मंदिर परिसरात फॉगर व स्प्रिंकलर्स लावण्यात यावेत, जेणेकरून परिसरात थंडावा निर्माण होईल.

दार्शनिक रांगेत व भाविकांच्या चालण्याच्या मार्गावर ओलसर ठेवता येतील अशा प्रकारचे मॅट्स (Floor Mats) अंथरावेत, ज्यामुळे उष्णता कमी होईल व चालताना त्रास जाणवणार नाही.

 मंदिर कॉरिडॉर व मंडप परिसरात मोठ्या क्षमतेचे कूलर्स व फॅन्स लावावेत, जेणेकरून भाविकांना तातडीने थंडावा मिळेल.

 मंदिर परिसरात व संस्थानाच्या विविध विकाणी मोफत थंडगार पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सोय करण्यात यावी.

१६ गुंठे क्षेत्रामध्ये दोन बाजूंनी बसण्याची सोय असलेली चेअर स्टँड्स उभारण्यात यावीत, विशेषतः ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग भाविकांसाठी.

वरील उपाययोजना तातडीने अमलात आणल्यास, शिर्डी येथील भक्तांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा-सुविधा देता येतील आणि श्री साईबाबा संस्थानचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपला जाईल. आपण सकारात्मक विचार कराल व त्वरित निर्णय घ्याल अशी आशा आहे. यावेळी निलेश शिंदे पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस दीपक भाऊ गोंदकर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमित दादा शेळके अजित जगताप , अमोल गिरमे , गंगाधर वाघ आधी कार्यकर्ते पद पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनाही निवेदन देण्यात आले वाढता उन्हापासून साईभक्त असे संरक्षण व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस युवक चे अध्यक्ष निलेश भाऊ शिंदे पाटील यांनी साई भक्तांसाठी स्प्रिंकलरची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे त्यावर सकारात्मक चर्चा झाली असून लवकर साई भक्तांचा उष्णतेपासून बचाव होईल अशा उपायोजना केल्या जातील

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा