सोनगाव ( प्रतिनिधी )
सोनगाव:लोणी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर साबळे यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियन अहिल्यानगर जिल्हा सचिव पदी निवड नुकतीच निवड करण्यात आली .राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर साबळे यांना जोगेश्वरी अंधेरी येथे दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित म्हामुनकर यांच्या कडून प्रमाणपत्र पाठविण्यात आले .
या निवडीमुळे सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच प्रमोद पंडित ( अपंग सेवा दल अध्यक्ष ) यांनी पाथरे बुद्रुक पंचक्रोशीतून तसेच लोणी येथील त्यांचे हितचिंतकांमधून अभिनंदन करण्यात आले आहे .