September 21, 2025 12:48 pm

संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या व्हा.चेअरमनपदी संदीप गुरुळे यांची निवड सल्लागार पदी पराग संधान व महेंद्र नाईकवाडे

प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक कोपरगाव:युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या व्हा. चेअरमन पदी संदीप गुरुळे यांची निवड करण्यात आली.तर सल्लागार म्हणून अमृत संजीवनचे चेअरमन पराग संधान आणि युवा उद्योजक महेंद्र नाईकवाडे यांची निवडणूक अधिकारी श्री.रहाणे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली आहे.

संजीवनी सहकारी पतसंस्था अतिशय दूरदृष्टीने माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केली होती.या पतसंस्थेच्या माध्यमातून ठेवीदार आणि खातेदार यांना तत्पर सेवा देण्यात येते.अतिशय दर्जेदार आर्थिक आलेख असणारी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त आहे.अशा संस्थेवर वरील पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने आनंद व्यक्त होत आहे.

संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा. आ. स्नेहलताताई कोल्हे,सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.यावेळी चेअरमन प्रदीप नवले आणि मा. व्हा.चेअरमन राजेंद्र परजणे यांच्यासमवेत संचालक मंडळाने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या.

प्रसंगी संचालक शिवाजीराव लहारे,भाऊसाहेब आदिक, राजेंद्र बागुल,श्रीकांत चांदगुडे, सौ.मंदाकिनी बडवर, सौ.मनिषा राऊत आदी उपस्थित होते.शेवटी आभार मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. व्ही. रोहमारे यांनी मानले.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा