September 21, 2025 9:45 am

संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या स्वीकृत संचालकपदी पराग संधान व महेंद्र नाईकवाडे

प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक 

कोपरगाव :सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या स्वीकृत संचालकपदी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान आणि प्रसिद्ध युवा उद्योजक महेंद्र नाईकवाडे यांची निवड करण्यात आली आहे. दोन्ही नविन संचालकांची निवड संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, त्यांच्या माध्यमातून संस्थेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नवीन संचालकांचा सत्कार संस्थेचे चेअरमन प्रदीप नवले व उपाध्यक्ष संदीप गुरुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी उपाध्यक्ष राजेंद्र परजने, संचालक राजेंद्र बागुल, अनंत पाटील बडवर, श्रीकांत चांदगुडे, गणपत राऊत,जयराम सांगळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.व्ही. रोहमारे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

संजीवनी सहकारी पतसंस्था ही माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी दूरदृष्टीने शेतकरी, कामगार, ठेवीदार आणि व्यापारी वर्गाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्थापन केलेली एक महत्वाची आर्थिक संस्था आहे. या संस्थेने गेल्या काही दशकांपासून ग्रामीण भागात आर्थिक सक्षमतेसाठी मोलाचे योगदान दिले आहे.

नवीन संचालक पराग संधान हे अमृत संजीवनीचे यशस्वी नेतृत्व करत असून त्यांचा अनुभव आणि दूरदृष्टी संस्थेस लाभदायक ठरेल. तर महेंद्र नाईकवाडे हे युवा पिढीतील यशस्वी उद्योजक असून त्यांनी उद्योगक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

नवीन संचालकांची निवड झाल्यानंतर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे आणि युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दोघांचे हार्दिक अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा