September 21, 2025 9:44 am

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कोपरगाव मतदारसंघात निबंध, रांगोळी स्पर्धा व विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन

प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक

कोपरगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मा.आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांना भव्य स्वरूप देण्यात आले.

या उपक्रमांतर्गत निबंध व रांगोळी स्पर्धा घेतल्या गेल्या, ज्यांना विद्यार्थ्यांचा आणि महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला. निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर आधारित विचार मांडून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उजळणी केली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक – ओम प्रमोद सोनवणे, द्वितीय क्रमांक – अवनी महेश आमले, आणि तृतीय क्रमांक – उत्कर्ष पंकज जाधव यांनी पटकावला. या स्पर्धेचे पर्यवेक्षण सौ. श्रद्धा जवाद मॅडम यांनी काटेकोरपणे केले.

रांगोळी स्पर्धेमध्ये महिलांनी रंगांच्या माध्यमातून आपल्या सर्जनशीलतेद्वारे अहिल्यादेवींना अभिवादन केले. यामध्ये प्रथम क्रमांक – सौ. अनुराधा अंकुश जोशी, द्वितीय क्रमांक – सौ. वंदना संतोष मैंदड, आणि तृतीय क्रमांक – सौ. पायल चेतन पुरोहित यांनी मिळवले. या स्पर्धेचे निरीक्षण श्री. अनिल अमृतकर सर यांनी केले. विजेत्यांना आकर्षक बक्षिसांनी गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाला शहराध्यक्ष भाजपा वैभव आढाव यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धकांचे कौतुक केले. उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये श्री. कैलास खैरे, श्री. भाऊसाहेब बागुल, बंटी हलवाई, कल्पेश नरोडे, कैलास नांगरे, राहुल आढाव, सिद्धार्थ डोंगरे, प्रणव आमले, प्रशांत आढाव, किशोर शिंदे मेजर, हर्षल नरोडे, सुनील आभाळे, हर्षल जोशी, अविष्कार महिले, विकी नरोडे, राहुल नरोडे, बाळासाहेब मेथाने, चंद्रकांत वाघमारे, देविदास बागुल, श्रीकांत नरोडे, आकाश आमले यांचा समावेश होता. महिलांमध्ये सौ. आढाव ताई, सौ. जोशीताई, सौ. मैंदड ताई यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

दरम्यान, कोपरगाव विधानसभा मतदारसंघामधील विविध मंडळांमार्फत सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. कोपरगाव पूर्व मंडल अध्यक्ष विशाल गोर्डे यांनी वारी येथील जगदंबा माता मंदिर येथे स्वच्छता अभियान राबवले. कोपरगाव पश्चिम मंडल अध्यक्ष सुनील कदम यांनी कुंभारी येथील रामेश्वर मंदिरामध्ये महाआरती व वृक्षारोपणाचे आयोजन केले. कोपरगाव शहर मंडल अध्यक्षांनी श्री रामेश्वर महादेव मंदिर दत्त पार येथे स्वच्छता मोहीम राबवून निबंध व रांगोळी स्पर्धांचेही आयोजन केले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व इतिहासाची ओळख निर्माण झाली. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करत संयोजकांचे कौतुक केले. विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून, अशा स्पर्धांमुळे नव्या पिढीत सर्जनशीलता व सामाजिक भान वाढीस लागते, असे गौरवोद्गार व्यक्त केले. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी प्रतिमापूजन करून अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी केली.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा