September 21, 2025 5:20 am

पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय 

अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे

लोणी : अहमदाबाद येथे घडलेल्या विमान अपघाताच्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून,कार्यकर्त्यानी जाहीर कार्यक्रम सत्काराचे नियोजन न करण्याचे आवाहन केले आहे.

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात मंत्री विखे पाटील यांनी म्हणले आहे की,अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या घटनेत भाजपाचे जेष्ठ नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २६५ प्रवाशांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आहे.यामध्ये महाराष्ट्रातील दहा व्यक्तीचा समावेश असून कधीही भरून न येणारी हानी असल्याने संपूर्ण देश या घटनेन हादरला आहे.

घटनेतील सर्व मृत नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति सर्वाच्या संवेदना आहेतच.या कठीण संकटातून सर्व कुटूबियांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी ही प्रार्थना आहेच.

आशा सर्व परीस्थितीत कोणतेही सार्वजनीक तसेच सत्कार सोहळे आयोजित करणे उचित होणार नाही.त्यामुळे आपण वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी सत्काराचे कोणतेही साहीत्य घेवून येवू नये असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.

सामाजिक दायित्व म्हणून समाजातील गरजू, निराधार एकल महीलांना मदत तसेच विद्यार्थ्याना शालेय साहीत्य वाटप करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाला पाठबळ म्हणून प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांवर वृक्ष संर्वधानची चळवळ म्हणून एक पेड माँ के नाम उपक्रम राबविण्याचे मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले आहे.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा