अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
श्रीरामपूर : येथील भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेची अधिकाऱ्यांसमवेत आज पाहणी करून लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहे.
गेल्या आठवड्यात शिष्टमंडळासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. सदर बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया सदर जागेची स्थळनिश्चिती करणे करिता अधिकाऱ्यांना समक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आज सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
सदर स्मारकाची जागा वन विभागाची असून वन विभागाने तातडीने भूमी अभिलेख कार्यालयाकडे जागा निश्चितीचा अहवाल सादर करावा जेणेकरून पुढील कार्यवाही करणे सोयीचे होणार असल्याचे मत मांडताना हे काम तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासनाने पुढील कार्यवाही सुरू करावी अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या.
यावेळी उपनगराध्यक्ष श्री. करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री. सचिन गुजर, माजी सभापती श्री. बाबासाहेब दिघे, वनविभागाचे श्री. निलेश रोडे, भूमी अभिलेख कार्यालयाचे श्री. खरोटे, नगररचना विभागाच्या सौ. सुचिता शिंदे, भीमशक्तीचे श्री. संदीप मगर, माजी सरपंच श्री. सुनील शिरसाठ, श्री. के.सी शेळके, श्री. अशोकभाई बागुल, श्री. सुनील मगर, श्री. सुहास राठोड, श्री. रितेश एडके, श्री. वैभव पंडित, श्री. किरण खंडागळे, श्री. मोहन आव्हाड, श्री. सुरेश जगताप, श्री. मनोज काळे, श्री. अंतोन शेळके, श्री. सोमनाथ पटाईत, श्री. आसाराम पोटभरे, श्री. आकाश शेटे, श्री. मच्छिंद्र ढोकणे, श्री. सचिन राठोड, श्री. पी जी सावंत, श्री. इंगळे साहेब, श्री. मस्के साहेब यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.