September 20, 2025 12:31 pm

दिघेवस्ती(धानोरे)शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे

धानोरे: १ ऑगस्ट २०२५ रोजी उपक्रमशील व आदर्श जि.प.प्राथमिक शाळा दिघेवस्ती(धानोरे), ता.राहुरी शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री.प्रभाकर शिंदे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शाळेचे उपक्रमशील व आदर्श शिक्षक श्री.राजेंद्र बोकंद सर यांनी प्रास्ताविक भाषणात या दोन महान व्यक्तिमत्वांचे कार्य आणि जीवनपट विद्यार्थ्यांना सांगितला. यावेळी शाळेतील अच्युत पुलाटे, स्वामी अंत्रे, आरोही डुक्रे, हर्ष जाधव, आरुषी सिनारे, सई दिघे,प्रणवी वाणी, उत्कर्ष वाणी, सेजल दिघे, वेदिका दिघे, आरोही खुळपे, वैभवी कांबळे, संस्कार खेमनर, कनक खेमनर, दिव्या सिनारे, आलिया तांबोळी, सर्वज्ञ जाधव, तोहीद तांबोळी या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनचरित्रावर व अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्यावर भाषणे सादर केली. मनोगत व्यक्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना देशभक्ती, समाजसेवा व कष्टाला प्रतिष्ठा देणाऱ्या विचारांची प्रेरणा मिळाली. उपस्थित सर्वाना सामाजिक न्याय व राष्ट्रप्रेमाच्या मूल्यांची जाणीव करून देण्यात आली.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती,सामाजिक समता आणि प्रेरणादायी विचारांची बीजे पेरली गेली.
मुख्याध्यापक श्री. प्रभाकर शिंदे सर यांनी शाळा पातळीवर आयोजित केलेल्या इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी 30 पर्यंत पाढे पाठांतर स्पर्धेतील ३१ यशवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफींचे वितरण करण्यात आले.यावेळी शाळेतील मुख्याध्यापक प्रभाकर शिंदे सर,राजेंद्र बोकंद सर,विद्याताई उदावंत मॅडम,सुनिता ताजणे मॅडम, मनिषा शिंदे मॅडम, सोमनाथ अनाप सर व पालक उपस्थित होते.शेवटी वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा