अहिल्यानगर मराठी न्यूज :प्रतिनिधी सुनिल गोलांडे
जामखेड -रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी-दक्षिण पीठ नाणीजधाम यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा दि. ११ व १२ ऑगस्ट २०२५ सकाळी ९ वा. स्थळः जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ उपपीठ उत्तर महाराष्ट्र, श्रीक्षेत्र रामशेज, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथे संपन्न होत आहे. सोहळ्याचे औचित्य साधून ११ ऑगस्ट उपासक दीक्षा व १२ ऑगस्ट रोजी साधक दीक्षा सुद्धा संपन्न होणार आहे.
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या “तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा” ह्या दिव्य शिकवणीतून, संस्थानाच्या वतीने असंख्य सामाजिक उपक्रम दररोज राबविले जातात. जसे कि, महामार्गांवर विनामूल्य ५३ ॲम्बुलन्स, विनामूल्य इंग्रजी माध्यमाची शाळा, शेकडो मरणोत्तर देहदान व अवयवदान, विनामूल्य ब्लड-इन-नीड सेवा, लाखो रक्तदान, ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रम, वैद्यकीय उपक्रम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन महिला सक्षमीकरण, आपत्कालीन मदत उपक्रम संपन्न केले जात आहेत.आयोजक – जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम-उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक