अहिल्यानगर मराठी न्यूज :संपादक शहाजी दिघे
सात्रळ प्रतिनिधी (अनिल वाकचौरे) : रक्षाबंधनच्या पावन पर्वावर विश्वरक्षक परमपिता परमात्मा यांच्या कडून रक्षासूत्र ईश्वरीय राखी बांधून असुरक्षिततेच्या वर्तमान समयी आपल्या तन,मन,धन व जनाला सुरक्षित करूया. अलौकिक रक्षाबंधन साजरे करून दिव्य गुण व शक्तिंचे सुरक्षा कवच प्राप्त करूया.असा संदेश सोनगाव सेवाकेंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रम्हाकुमारी पद्मावती दीदींनी दिला.
राहुरी विभाग संचालक ब्रम्हाकुमार शिवाजी भाई यांनी सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या.
ब्रम्हाकुमारी छाया,निकिता व आनंद गुरूकुल च्या प्राचार्या अर्चना मॅडम यांनी रक्षाबंधनाचे महत्व विषद केले.
किसान विकास सेवा संघाचे अध्यक्ष ब्रह्मकुमार नामदेवराव डुकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देऊन आभार व्यक्त केले .सदर कार्यक्रमास जे पी जोर्वेकर, रमेश पन्हाळे, प्रकाश वालझाडे, अनिल वाघचौरे राजेंद्र वालझाडे, संतोष लोढा,हिरानंदानी, जोर्वेकर ताई, अनिता वालझाडे ,वैशाली वालझाडे तसेच परिसरातील बंधु भगिनी उपस्थित होते.