अहिल्यानगर मराठी न्यूज : संपादक शहाजी दिघे
सोनगाव प्रतिनिधी(अनिल वाकचौरे): राहाता तालुक्यातील पाथरे बु: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त व जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्रतिमेला अभिवादन करून गावामध्ये वृक्षारोपण व स्वछता अभियान राबविण्यात आले.
यावेळी पाथरे बु चे सरपंच उमेश घोलप, उपसरपंच आरिफ शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती अण्णाभाऊ कडू,मेजर सोनल कदम, मा.सरपंच हिरामण कदम, ग्रा.पं. सदस्य सर्जेराव कदम, युवा नेते वैभव कदम, प्रमोद कदम,भैया कदम, नंदू कदम, यशवंत मंडलिक, उमेश पिंपळे, सिराज शेख,बादशहा भाई,बाबजी कडू,विजय बोधक,पवन कदम,पिंटू विधाटे, मुन्ना घोलप,निलेश कदम आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला.