September 19, 2025 8:49 pm

दुर्गापूर येथे अखंड हरीनाम सप्ताह सुरु

अहिल्यानगर मराठी न्यूज शहाजी दिघे

धानोरे प्रतिनिधी: दुर्गापूर येथील अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास शुक्रवार पासून प्रारंभ झाला. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तनासह महाप्रसाद आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. योगीराज गंगागिरीजी महाराज, ब्रम्हलिन नारायणगिरीजी महाराज, सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज आणि उंबरेश्वर देवस्थानचे मठाधिपती महंत दत्त गिरीजी महाराज आणि ह. भ. प. मुकेश महाराज तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणांचा प्रारंभ उंबरेश्वर देवस्थानचे मठाधिपती महंत दत्तगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. यावेळी दुर्गापूरचे सरपंच नानासाहेब पुलाटे, उपसरपंच प्रमिला पुलाटे, बाबासाहेब पुलाटे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब पुलाटे, सेवा दिनकर रोकडे, बाबासाहेब रोकडे, वेणूनाथ पुलाटे, मुकेश महाराज तांबे उपस्थित होते. सप्ताहामध्ये संदीप महाराज चेचरे यांचे श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त निमित्त रात्री दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तन पार पडणार आहे. यानंतर दररोज सायंकाळी अर्जुन महाराज चौधरी, बाळा महाराज आहेर, भगवान महाराज मोरे, राजेंद्र महाराज चोरडिया यांचे किर्तन पार पडणार असल्याची माहिती सप्ताह समितीने दिली.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें