अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
धानोरे प्रतिनिधी : प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे श्री संत कवी महिपती महाराजांचा २३५वा समाधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. संतकवी महिपती महाराजांचा समाधी सोहळा व भक्तविजय ग्रंथाचे पारायण गुरुवार दि. १४ ऑगस्ट ते गुरुवार दि. २१ ऑगस्ट ह्या पर्वणीत होत आहे. ह्या निमित्ताने श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आषाढ वद्य नवमी ते अमावस्येपर्यंत
संत कवी महिपती महाराज पांडुरंगाच्या सेवेत मग्न होऊन श्रावण वद्य द्वादशीला (इ. स. १७९०) मध्ये गुरुवारी मध्यान्ही पांडुरंगाच्या चरणी श्रावण वद्य द्वादशीला ५० हजार पुरणपोळीचेआयोजन करण्यात आले आहे.
शके १७३८च्या सुमारास मल्हारराव होळकर यांनी महिपतींच्या समाधी सोहळ्याला प्रारंभ केला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील आंदरसूल येथील शिष्य आनंदराव सटवाजी शेकदार यांनी महिपतींचे समाधी वृंदावन बांधले. श्रावण वद्य द्वादशीला श्रीक्षेत्र ताहाराबाद येथे संत कवी महिपतींचे देहावसान व नांदूर खंदरमाळ येथील शिष्य धोंडीभाऊ यांचे देहावसान एकाच वेळी झाले, हे विशेष!अनंतात विलीन आले. त्यानिमित्ताने सालाबादप्रमाणे पुण्यतिथी समाधी सोहळा संपन्न होत आहे. देवस्थानचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.