September 19, 2025 7:05 pm

श्री. मोठेबाबा मंदिर जीर्णोद्धार (प्राणप्रतिष्ठा) सोहळा सात्रळ मध्ये साजरा

अहिल्यानगर मराठी न्यूज :संपादक शहाजी दिघे

सात्रळ प्रतिनिधी(अनिल वाकचौरे ): सात्रळ गावचे देवस्थान श्री मोठेबाबा मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा शके १९४७ श्रावण कृष्ण ll६ गुरुवार दि. १४/०८/२०२५ रोजी सकाळी ११:०० वा या शुभ मुहूर्तावर *प. पु. श्री. दत्तगिरीजी महाराज मठाधिपती वरवंडी देवस्थान ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर* यांचे शुभहस्ते करण्यात आला या निमित्ताने बुधवार दि.१३/०८/२०२५ रोजी सकाळी १०:०० ते २:०० वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी व मूर्ती ग्राम मिरवणूक करण्यात आली व गुरुवार दि. १४/०८/२०२५ रोजी सकाळी९:०० ते ११:०० वाजेपर्यंत धार्मिक विधी व पूजा पाठ करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला या यज्ञाचे प्रधान आचार्य श्री. प्रविण गुरु शिरसागर (सात्रळ) हे होते श्री मोठेबाबा देवस्थान हे सात्रळ गावचे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रचलित आहे श्री मोठेबाबा या नावावर श्रद्धा ठेवून धार्मिक पलघडमल परिवार व ग्रामस्थ यांनी सर्व धर्म – पंथ भेद – भाव बाजूला ठेवून या मंदिराचा जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा करण्याचा निर्धार करून सर्व सात्रळ व पंचक्रोशी मधील ग्रामस्थांकडून देणगी एकत्रित करून तसेच स्वखर्चाने हे मंदिर उभारून प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न केला. या मंदिर जीर्णोद्धारासाठी मा. आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी ५१०००/- देणगी देऊन भरीव मदत केली. या धार्मिक सोहळ्यासाठी भाजप उपाध्यक्ष अहिल्यानगर अमोलजी भानगडे , भाजप तालुका अध्यक्ष युवराज आबा गाढे , समीर पठाण, सुकुमार पवार,अनिल पवार,,नितीन ढेरे, नारायण धनवट,योगेश गीते,विलास मुसमाडे,सागर मुसमाडे सरपंच तांभेरे,रामदास मुसमाडे,किरण अरुण कडू पा.मच्छिंद्र अंत्रे सर,बाळकृष्ण चोरमुंगे वसंत डुक्रे पा. संचालक प्रवरा सहकारी बँक प्रवरानगर,प्रतापराव कडू पा. जयवंत जोर्वेकर,रमेश पन्हाळे सतीश ताठे सरपंच सात्रळ,गोरक्षनाथ नालकर पा. साहेबराव नालकर पा. इंजिनीयर अजित जोर्वेकर, जय बाबा पत्रकार,अनिलजी वाकचौरे ,रूपक वाघचौरे, रवींद्र दिघे, सहादू रंगनाथ पलघडमल, नामदेव चिमाजी पलघडमल, सदू भिमाजी पलघडमल, पंढरीनाथ कडू पा. समवेत सात्रगावच्या सप्ताह कमिटीचे अधिकारी व सहकारी भाविक उपस्थित होते

    हा धार्मिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पावलस कचरू पलघडमल, प्रभाकर पलघडमल, भास्कर पलघडमल, चांगदेव पलघडमल, डॉ. विश्वास पलघडमल, नामदेव पलघडमल, डॉ. मधुकर पलघडमल, विजय पलघडमल, बाळासाहेब पलघडमल, विजय लक्ष्मण पलघडमल, योगेश शशिकांत पलघडमल, दिलीप पलघडमल, रमेश खरात, संजय पलघडमल, वैभव पलघडमल, विनोद पलघडमल सर, अभय पलघडमल, संकेत पलघडमल, महेंद्र पलघडमल, राजेश पलघडमल, प्रवीण विधाटे इत्यादीचे सहकार्य लाभले या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातून बहुसंख्येने भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें