September 19, 2025 7:03 pm

किडनी दान करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला

अहिल्यानगर मराठी न्यूज :संपादक शहाजी दिघे

सात्रळ वार्ताहर (अनिल वाकचौरे )अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील श्री अशोक सखाहारी गागरे यांनी आपल्या मुलाला स्वतःची किडनी देऊन समाजापुढे अवयदानचा एक आदर्श निर्माण केला.

राहुरी तालुक्यातील श्री प्रशांत अशोक गागरे वय वर्ष ३२ मुंबई येथील टोरेंट पावर कंपनीत नोकरी करतात २०२३ मध्ये पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी अहिल्यानगर येथील डॉक्टर कलानी हॉस्पिटल मध्ये तपासणी केली असता त्यांच्या दोन्ही किडन्य निकामी असल्याच्या डॉक्टरांनी सांगितले किडनी बदलण्याचा सल्ला दिला 

त्यांनी नाशिक येथील अपोलो हॉस्पिटल मधील डॉक्टर मोहन पटेल त्यांच्याकडे तपासणी केली असता डॉक्टरांनी किडनी बदलण्याचा सल्ला दिला हे ऐकून प्रशांत यांचे वडील अशोक सखाहरी गागरे यांनी स्वतःची एक किडनी देण्याचा तयारी दर्शवली व सर्व कागदपत्राची पूर्तता करून डॉक्टर मोहन पटेल यांच्या हॉस्पिटलमध्ये अशोक सखहरी गागरे यांची एक किडनी काढून प्रशांत यांच्या वर यशस्वीरित्या किडनी रोपण करण्यात आले यानिमित्त अहिल्यानगर येथे १५ ऑगस्ट २०२५ रोजी अहिल्यानगरचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें