अहिल्यानगर मराठी न्यूज : संपादक शहाजी दिघे
सात्रळ प्रतिनिधी (अनिल वाकचौरे ): आनंद गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये गोपालकाला (कृष्णजन्माष्टमी) उत्सवानिमित्ताने ‘दहीहंडी’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील लहान–मोठ्या बालगोपालांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. लहान मुलांनी ‘राधा–कृष्ण’ यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून आपल्या सादरीकरणाने कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत आणली. या वेळी शाळेचे चेअरमन डॉ. के. के. बोरा सर व विश्वस्त लिलावती बोरा मॅडम यांनी स्वतः उपस्थित राहून बालगोपालांसोबत सहभाग घेतला व मुलांचे कौतुक केले.मोठ्या बालगोपालांनी पारंपरिक पद्धतीने मानवी मनोरा करून दहीहंडी फोडली आणि संपूर्ण प्रांगणात “गोविंदा आला रे आला” या जयघोषाने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमानंतर सर्व बालगोपालांना प्रसादाचे वाटप करण्यात आले व त्यांनी मोठ्या आनंदाने प्रसादाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या अर्चना प्रधान मॅडम, उप–प्राचार्या भाग्यश्री साबळे मॅडम, सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी सर्वांनी मिळून “जय श्रीकृष्ण” या घोषणांनी वातावरण भारावून गेले.
अशा प्रकारे आनंद गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये गोपालकाला व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक जल्लोषात पार पडला.