September 19, 2025 5:10 pm

बारागाव नांदूरला निधी कमी पडू देणार नसल्याची अक्षय कर्डिले यांची ग्वाही; १० लाख रुपयांच्या सुशोभिकरण कामाचे लोकार्पण

अहिल्यानगर मराठी न्यूज : संपादक शहाजी दिघे

राहुरी : आमदार शिवाजी कर्डिले यांचे बारागाव नांदूर गावावर विशेष प्रेम राहिले आहे. आज अखेर विविध विकास कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. गावाचे श्रद्धास्थान असलेल्या मारुती मंदिर परिसराच्या सुशोभिकरणासाठी १० लाखाचा निधी देत सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाल्याचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी सांगितले.

बारागाव नांदूर गावातील मारुती मंदिर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. शिवाजी कर्डिले व माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून नागरी सुविधा अंतर्गत १० लाखाचा निधी दिला आहे. त्यातून मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले. बारागाव नांदूर येथील मारुती मंदिरातील हरिनाम सप्ताहच्या काल्याच्या किर्तनाचे औचित्य साधत लोकार्पण करण्यात आले. सप्ताहला

उपस्थिती देणारे अक्षय कर्डिले यांनी बारागाव नांदूर गावाला निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली आहे.

आ. शिवाजीराव कर्डिले यांची प्रकृती सर्वांच्या आशिर्वादाने ठणठणीत आहे. पाठीचे ऑपरेशन यशस्वी झाले असून ते लकवरच जनतेच्या सेवेत हजर होणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले. बारागाव नांदूर व सात्रळ मंडलाचे अध्यक्ष युवराज गाडे यांनी कर्डिले यांचा सन्मान केला. बारागाव नांदूर सप्ताह कमेटीच्या वतीने निधी दिल्याबद्दल कर्डिले यांचा सन्मान राजेंद्र गाडे यांनी केला. माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी पवार, कैलास पवार, सेनेचे बाळासाहेब गाडे, संजय मोरे, जालिंदर गाडे, राजेंद्र गोपाळे, सुकुमार पवार, समीर पठाण, अनिल पवार, सुजित आघाव, अनिल कावरे, नितीन गाडे, संतोष गाडे उपस्थित होते.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें