अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
अहिल्यानगर : ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत पंचायत समिती शेवगाव व पाथर्डी येथे आयोजित तालुकास्तरीय कार्यशाळेस उपस्थित राहून आ. मोनिकताई राजळे यांनी मार्गदर्शन केले.
या अभियानाचा मुख्य हेतू गावागावात विकासाची गंगा पोहोचवणं, ग्रामपंचायती सक्षम करणं आणि गावं स्वावलंबी बनवणं हा आहे. महात्मा गांधीजींनी संदेश दिल्याप्रमाणे भारताचा आत्मा खेड्यांत आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीने या अभियानात सहभागी होऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत.
या कार्यशाळेत ग्रामीण भागातील गावांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज व्यक्त केली. या कार्यशाळेच्या माध्यमातून स्वच्छ व हरित गाव तयार करणे, शिक्षणाचा दर्जा उंचावणे, रोजगाराच्या संधी वाढवणे आणि शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे या मुद्द्यांवर भर देण्यात आला.
या कार्यशाळेस आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री मा.श्री. पोपटराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आनंद भंडारी पंचायत समितीचे विविध अधिकारी, तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.