अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
राहूरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्याच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणजे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने भव्य मोफत स्रिरोग वंध्यत्व कॅन्सर निदान, नेत्र चिकित्सा, योग, प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राजक्त तनपुरे यांचा १३ सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने राहुरी तालुक्याच्या व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान, राहरी या संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत अहिल्या भवन स्टेशन रोड येथे भव्य मोफत स्रिरोग वंध्यत्व, कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे संस्थेचे अध्यक्ष विजय तमनर यांनी सांगितले.
डॉ. माने मेडिकल फाउंडेशन संचलित साईधाम हॉस्पिटल राहुरी व एस.बी.आय फाउंडेशन यांच्यावतीने अद्यावत अशा तंत्रज्ञानाचा वापर करून भव्य दिव्य अशी एस.बी.आय. कॅन्सर केअर कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन त्यामध्ये महिलांच्या आरोग्याची मोफत तपासणी, मोफत औषधे, मोफत सोनोग्राफी, मोफत गर्भमुख कॅन्सर तपासणी, मोफत स्तनांच्या गाठींची कॅन्सर तपासणी, मोफत तोंडाचा कॅन्सर तपासणी केली जाणार असून या तपासण्या मोफत व रिपोर्ट त्याच दिवशी दिला जाईल व गरजू महिलांना शस्त्रक्रियाची आवश्यकता लागल्यास महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत व अल्प दरात केल्या जाणार आहेत.
पुणे येथील बुधरानी हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक यांचा मोठा सहभागी होणार आहे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने नेत्र तपासणी करून अल्प दरामध्ये चष्म्याचे वाटप केले जाणार आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्याविषयी आरोग्यम योग केंद्र यांच्यावतीने सूर्यनमस्कार यांत्रिक जॉगिंग सर्व प्रकारच्या व्याधीनुसार असणे, मनाच्या एकाग्रतेसाठी ध्यान, प्राणायाम, आहाराचे मार्गदर्शन अहिल्या भवन येथे योग केंद्र सुरू होऊन प्रशिक्षित असे महिला योगशिक्षक योजनाताई लोखंडे व मनिषा वासकर यांचे रोज मार्गदर्शन लाभणार आहे.
राहुरी तालुक्यातील तमाम माता भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान विजय तमनर यांनी केले आहे.