September 19, 2025 8:35 am

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

अहिल्यानगर मराठी न्यूज शहाजी दिघे 

संगमनेर प्रतिनिधी : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीची सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षांची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात पार पडली. या प्रसंगी उपस्थित राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला.

 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या शेतमालाचे योग्य व्यवस्थापन व्हावे या उद्देशाने राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यानंतर या योजनेचा आदर्श घेऊन देशभरात मार्केट कमिट्या सुरू झाल्या.

 

संगमनेर मार्केट कमिटीने शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत नियोजनबद्ध व प्रामाणिकपणे काम केले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची उपलब्धता व्हावी आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सातत्याने सुधारणा घडावी या दृष्टीने समितीची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. काटकसर, पारदर्शकता आणि शेतकरीहिताचे धोरण यांमुळे समितीने उल्लेखनीय प्रगती साधली आहे.

या सर्वसाधारण सभेत सर्वात जास्त माल विक्रीस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच सर्वाधिक माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. यामुळे शेतकरी–व्यापारी संबंध अधिक दृढ होऊन परस्पर सहकार्याची नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या दोन दशकांहून अधिक काळात घडवलेली ही प्रगती आणि घडवलेली सकारात्मक परंपरा खरोखरच अभिमानास्पद आहे. ही सातत्यपूर्ण वाटचाल नक्कीच भविष्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी दिशादर्शक ठरेल, असा मला मनापासून विश्वास आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें