September 19, 2025 8:33 am

सारथी’च्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध !

अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे

लोणी प्रतिनिधी : पुणे येथील सारथी संस्थेच्या कार्यालयाला जलसंधारण मंत्री व अहिल्यानगर चे पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

तसेच, या भेटीदरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून मराठा समाजातील विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती घेतली. यासोबतच शिष्यवृत्ती प्रकरणांबाबत असलेले प्रश्न, उपलब्ध निधी व आवश्यक सुविधा याविषयीही सविस्तर चर्चा केली.

यासोबतच, सारथी संस्थेच्या योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्या साठी तसेच रोजगार उपलब्ध करणाऱ्या उपक्रमांना चालना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत या बैठकीत व्यक्त केले. तसेच, त्यादृष्टीने आवश्यक ती पाऊले तातडीने उचलण्याच्या सूचना केल्या.
यावेळी मराठा समाजातील अनेक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, त्यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सारथी संस्थेचे बळकटीकरण होत असून, या संस्थेमार्फत मराठा समाजातील युवक-युवतींना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सारथी संस्थेचे अध्यक्ष श्री. अजित निंबाळकर, कार्यकारी संचालक श्री. महेश पाटील, समिती सदस्य श्री. उमाकांत दांगट यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें