अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
कोपरगाव प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या उपक्रमास मंजुरी देण्यात आली असून, नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा, तक्रारींचे निराकरण तसेच शासकीय सेवांचा वेळेत लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या सेवा पंधरवड्यात आपले सरकार, महावितरण, डी.बी.टी., नागरी सेवा केंद्र तसेच विविध विभागांचे स्वतः चे वेबपोर्टल यावर १० सप्टेंबर २०२२ पर्यंत आलेल्या अर्ज व तक्रारींचे निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः मदत व पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, नगरविकास, आरोग्य, पाणीपुरवठा, महावितरण, आदिवासी विकास व सामाजिक न्याय या विभागातील सेवांचा समावेश या मोहिमेत करण्यात आला आहे.या उपक्रमाद्वारे शासनाने सर्वसामान्यांच्या अडचणींना प्राधान्य देऊन तातडीने तोडगा काढण्याचे ठरविले आहे. नागरिकांच्या शासन व जनता सहभागातून
यामधील दुवा अधिक बळकट होऊन विश्वास दृढ होणार आहे.या सर्व सुविधांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, अर्ज व तक्रारी वेळेत नोंदवून त्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले आहे.